आपले सनस्क्रीन निवडताना काळजी घ्या

sunscrin
सूर्यप्रकाशातील अल्ट्रा व्हायोलेट किरणांमुळे त्वचेला नुकसान होते परिणामी कडक उन्हात बाहेर पडताना सनस्क्रीनचा वापर करणे आवश्यक बनते. इतकेच नव्हे तर घरातील ट्यूबलाईटचा प्रकाशही त्वचेला नुकसान करत असतो. त्यालाही सनस्क्रीन वापरणे हा उपाय आहे. आजकाल बाजारात अनेक कंपन्यांची व अनेक प्रकारची सनस्क्रीन उपलब्ध आहेत. मात्र आपली त्वचा कशी आहे हे लक्षात घेऊनच त्यांची खरेदी केली गेली पाहिजे. विशेष म्हणजे उन्हात बाहेर पडायचे असेल तर अर्धातास अगोदरच सनस्क्रीन लावले पाहिजे व जास्त काळ उन्हात फिरावे लागणार असेल तर थोड्या वेळाच्या अंतराने पुन्हा एकदा सनस्क्रीनचा वापर केला गेला पाहिजे.

चांगला ब्रँड व महाग सनस्क्रीन तुमच्यासाठी योग्य असेलच याची कोणतीही खात्री देता येत नाही हे लक्षात घ्या. सनस्क्रीन निवडताना आपली त्वचा कशी आहे हे समजून घ्यायला हवे. म्हणजे त्वचा सावळी असेल तर मुळातच अेव्ही किरणांचा त्वचेवर फारसा परिणाम होत नाही त्यामुळे अशा वेळी जादा एसपीएफ असलेल्या सनस्क्रीनची गरज नसते. मात्र त्वचा उन्हाने टॅन झाल्याने काळवंडली असेल तर मात्र मूळ त्वचेचा रंग पहा. ऊन लागत नाही अशा भागातील त्वचा तुमचा खरा रंग सांगते त्यानुसार कमी अधिक एसपीएफ असलेले क्रिम निवडा.

sunscrin1
आपली त्वचा कोरडी असेल तर सनस्क्रीनची निवड करताना त्यात मॉईश्चरायझर असेल असे क्रिम निवडले पाहिजे यामुळे त्वचेचा कोरडेपणाही कमी होईल. या उलट त्वचा ऑईली असेल ऑईल फ्री सनस्क्रीन लोशन्स बाजारात उपलब्ध आहेत त्यांची निवड करायला हवी. थंडी अथवा पावसात १५ ते ३० एसपीएफ असलेली सनस्क्रीन पुरेशी असतात तर उन्हाळ्यात मात्र ५० ते ७० एसपीएफ असलेली सनस्क्रीन निवडायला हवीत.

वॉटरप्रूफ आणि वॉटररेझिस्टन्स अशी दोन प्रकारची सनस्क्रीन बाजारात आहेत. वॉटरप्रूफ सनस्कीन उन्हाळ्यातही सूर्यकिरणांत ८० मिनिटांपर्यंत पाण्यात त्वचेची देखभाल करू शकतात तर रेझिस्टंट क्रिम हेच संरक्षण ४० मिनिटांपर्यंत देऊ शकतात असा त्यात फरक आहे. सनस्क्रीनची निवड करताना हवामान व एसपीएफ प्रमाण यावर निवड करा तसेच प्रत्येक वेळी एक्स्पायरी डेटही तपासून घ्या. म्हणजे ही क्रिम पूर्णपणे उपयुक्त ठरतील अन्यथा त्यांच्यापासूनही नुकसान होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment