शास्त्रज्ञांनी विकसित केले समुद्रातील पाणी शुद्ध करण्याचे तंत्र !

sea-water
मुंबई – देशाच्या अनेक भागात सध्या भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तामिळनाडूतील शास्त्रज्ञांनी यावर तोडगा म्हणून समुद्रातील पाणी पिण्यायोग्य करण्याचे तंत्रज्ञान शोधले आहे. या शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की, रोज तब्बल ६३ लाख लिटर पाणी या तंत्राद्वारे शुद्ध करता येईल. हे संशोधन भाभा अणु संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी केले आहे.

शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज ६३ लाख लिटर दूषित पाणी अणुभट्‌टीतील निरूपयोगी बाष्पाचा वापर करून शुद्ध करता येईल. सध्या तामिळनाडूतील कल्पक्कुम येथे हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. तसेच भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक के. एन. व्यास यांनी पं. बंगाल, राजस्थान येथेही हा प्रयोग राबविण्यात येत असल्याची माहिती सांगितले. अत्यल्प खर्चात पाण्यातील युरेनियम किंवा आर्सेनिक यासारखे घटक काढून टाकण्यासाठी गाळणी तयार केली असून त्याद्वारे पाण्याला शुद्ध करता येईल. असेही व्यास म्हणाले.

Leave a Comment