निसर्गानेच कोरलेय येथे जगातले सर्वात मोठे ॐ अक्षर

omprvat
हिंदू धर्मात हिमालय हा अतिशय पवित्र पर्वत समजला जातो. हिमालयाची उंच शिखरे आणि खोल दर्‍या अनेक रहस्ये त्यांच्या पोटात बाळगून आहेत अशी श्रद्धा आहे. कित्येक आश्चर्यकारक घटना येथे घडत असतात आणि हिमालय हे महान योगी, साधू संतांचे निवासस्थानही आहे. देवांचे देव महादेव यांचे निवासस्थान हिमालयातील कैलास पर्वतावर असल्याचे मानले जाते व त्यामुळेही हिमालय हिंदू भाविकांसाठी नेहमीच पूजनीय राहिलेला आहे.

कैलासाच्या वाटेवर लागणारा व ॐ नावाने ओळखला जाणारा पर्वतही भाविकांच्या हदयात विराजमान आहे. ६ किमीपेक्षाही अधिक उंचीच्या या पर्वतावर निसर्गानेच अशी किमया केली आहे की डोंगरमाथ्यावर अशा कांही घळी निर्माण झाल्या आहेत ज्यात बर्फ पडून ॐ हे अक्षर तयार होते. या पर्वताला छोटा कैलास, आदि कैलास, बाबा कैलास, जोंगलिंगकोंग अशा नावांनीही ओळखले जाते. हिंदू, बौद्ध व जैन धर्मियांचे हे श्रद्धास्थान आहे.

हवा स्वच्छ असेल तर या ॐ अक्षराचे खूपच सुंदर दृष्य दुरवरूनही पाहता येते. सूर्य किरणे पडताच हा पर्वत अवर्णनीय प्रकाशात चमकून उठतो. ते दृष्य पाहणार्‍याला स्वर्गाची अनुभूती देते. पूर्वी हा पर्वत हेच शिवाचे निवासस्थान होते असाही समज आहे. मात्र शिवाचे कुटुंब वाढल्यानंतर शिवाने कैलास पर्वत हे आपले निवासस्थान केले असे कथापुराणांतून वर्णन येते.

Leave a Comment