५० कोटी पार होणार इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या

internet
नवी दिल्ली : देशातील इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या या वर्षअखेरीपर्यंत ५० कोटींवर पोहचणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी दिली आहे.

देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढून ४० कोटींवर पोचली आहे. ट्रायच्या आकडेवारीनुसार, हा आकडा ३३.२ कोटींच्या आसपास आहे. दूरसंचार कंपन्यांच्या माहितीनुसार, ही संख्या ४०.२ कोटी आहे. वर्षअखेर ही संख्या ५० कोटी होईल, असे प्रसाद यांनी सांगितले. तसेच देशातील मोबाईलधारकांची संख्या १०० कोटींच्या पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले. लोकसभेतील आकडेवारीनुसार, फेब्रुवारीअखेरपर्यंत जीएसएम तंत्रज्ञान वापरणाऱ्या मोबाईल ग्राहकांची संख्या ९८.२ कोटी झाली आहे. सीडीएमए नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या ४.४५ कोटी आहे.

Leave a Comment