…आणि तिने जिंकली विप्रो विरोधातील न्यायालयीन लढाई

shreya-ukil
लंडन – अखेर विप्रो मॅनेजमेंट विरोधात मागील दोन वर्षापासून सुरु असलेली न्यायालयीन लढाई श्रेया उकिल या तरुणीने जिंकली आहे. २०१४ साली तिने लैंगिक शोषण, मानसिक छळ आणि विनाकारण नोकरीवरून बडतर्फ केल्याचा आरोप करत विप्रो मॅनेजमेंट विरोधात खटला दाखल केला होता.

याबाबत एका वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार मागील महिन्यात शहराच्या रोजगार ट्रिब्‍यूनलने याप्रकरणी श्रेयाच्या बाजूने निकाल दिला आहे. निकाल देतेवेळी न्यायालयाने श्रेयावर झालेल्या छळाला मान्य करत या कंपनीत एकाच पदावर काम करत असलेल्या दोन व्यक्तींच्या पगारात तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

तिच्या शरीर आणि कपड्यांवरून नेहमीच कमेंट्स पास केले जात होते. एवढेच नव्हेतर काहीजण तिला ‘श्रिल’, ‘शैलो’ आणि ‘बिच’ अशी हाक मारायचे. त्याचपार्श्वभूमीवर पीड़ित श्रेयाने कंपनीने १० कोटी रुपये दंड देण्याची मागणी केली होती. पण दुसरीकडे कंपनीने असा दावा केला आहे कि, न्यायालयाने त्यांच्या बाजूने फैसला देत श्रेयाला काम कमी करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे.

Leave a Comment