अॅपलला जुने फोन देशात विकण्यास बंदी

apple
नवी दिल्ली – आपला व्यवसाय भारतामध्ये वाढविण्याच्या प्रयत्नात असणारी दिग्गज कंपनी अॅपलला केंद्र सरकारने मोठा झटका दिला आहे. अॅपलला जुने स्मार्टफोन आयात करण्यासाठी व ते विकण्यासाठी परवानगी देण्यास सरकारने नकार दिला आहे. देशात ई-कच-यामध्ये जुने स्मार्टफोन आयात करण्यामुळे मोठी वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे पर्यावरणासाठी हे योग्य नसल्याचे केंद्र सरकारने म्हटल्यामुळे स्मार्टफोन निर्माता कंपनी अॅपलला हा मोठा झटका मानला जात आहे.

भारतामध्ये आपला व्यवसाय वाढविण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. जगभरात आयफोनच्या विक्रीत होत असलेली घट पाहता भारतामध्ये व्यवसायाची आशा ऍपलचे सीईओ टिम कुक यांना होती. मात्र त्यांची आशा फोल ठरली आहे. २०१५ मध्ये कंपनीला स्मार्टफोनच्या विक्रीमध्ये भारतामध्ये ५६ टक्क्यांचा फायदा झाला आहे. आम्ही या निर्णयाबाबत आमचे विचार कंपनीतील संबंधित अधिका-यांना कळविले आहेत. केंद्र सरकारने मागील वर्षी ऑगस्टमध्ये नोकिया, अॅपल आणि आयबीएम सारख्या कंपन्यांनी वापरलेले फोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू देशात आणण्यास बंदी घातली होती, असे वरिष्ठ अधिका-यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

Leave a Comment