सोन्यावरील उत्पादन शुल्क कमी करण्यास सरकारचा नकार

arun-jaitley1
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांवर असलेला १ टक्के उत्पादन शुल्क कमी करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. देशभरातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांच्या दबावापुढे न झुकता, केंद्रीय अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी आज आपण सोन्यावरील १ टक्का उत्पादन शुल्क कमी करणार नसल्याचे सांगितले.

सोन्यावर लावण्यात आलेल्या एक टक्का उत्पादन शुल्कामुळे ज्वेलर्स दुकानदारांनी देशभर आंदोलन केले होते. तसेच आपली दुकानेही बंद ठेवली होती. यावर तोडगा काढण्यासाठी ज्वेलर्सचे शिष्टमंडळ अरुण जेटलींनाही भेटले होते. ज्वेलर्सच्या मागण्यांचा विचार करु, असे आश्वासन जेटलींनी या शिष्टमंडळाला दिले होते. पण संसदेमध्ये मात्र सरकारचा हा निर्णय मागे घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Leave a Comment