भुरळ पाडेल हा ५०० मीटर लांबीचा तरंगता वॉकवे

walkway
चीनच्या हुबेई प्रांतातील शिजिगुआन पहाडाच्या घनदाट अरण्यातून वाहात असलेल्या नदीवर एक महाप्रचंड वॉकवे बांधला गेला असून त्याचे उद्घाटन १ मे रोजी म्हणजे कामगार दिनी करण्यात आले. या वॉकवे वरून चालण्याच्या आनंदाची तुलना स्वर्गप्राप्तीच्या आनंदाबरोबरच होऊ शकेल असे या वॉकवेला आपली पदकमले लावणार्‍या पर्यटक व स्थानिकांचे मत आहे.

चीनचा हा भाग अत्यंत निसर्गसुंदर तर आहेच पण आजपर्यंत येथील घनदाट अरण्यांचे नुसते दर्शन करायचे तरी मधून वाहणार्‍या नदीतून रोईंग बोटींचा वापर करावा लागत असे. या नदीवर आता हा १६४० फुटांचा म्हणजे सुमारे ५०० मीटरचा वॉकवे तयार केला गेला आहे. या वॉकवे वरून चालताना साक्षात नदीच्या पाण्यावरून चालल्याचा भास होतो. संपूर्ण लाकडात बनविला गेलेला हा तरंगता पूल पर्यटकांसाठीही खुला केला गेला आहे. या पुलाचे उद्घाटन होताच तळपत्या उन्हाची किंचितही पर्वा न करता स्थानिकांनी टोप्या व छत्र्या डोक्यावर घेऊन या पुलावरून चालण्याचा आनंद लुटलाच पण त्याचे सुंदर फोटोही काढले आहेत.

Leave a Comment