बुध ग्रहाचे भारतीयांना होणार दर्शन

venus
कोलकाता : सूर्याच्या समोरुन बुध ग्रह हा जातांनाचा प्रवास तुम्हाला अनुभवता येणार आहे. हा दुर्मिळ क्षण तुम्हाला येत्या ९ मे रोजी संध्याकाळी ४.३० वाजता पाहायला मिळणार आहे. याआधी २००६ मध्ये ही दुर्मिळ घटना घडली होती. त्यानंतर जवळजवळ १० वर्षानंतर भारतीय खगोलप्रेमींना ही दुर्मिळ घटना बघायला मिळणार असल्याचे कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले आहे.

सूर्याच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला सरकणारा काळ्या रंगाचा ठिबका म्हणजे बुध असेल. तसेच सूर्य, बुध आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत येणार आहेत त्यामुळे बुध ग्रहाचा प्रवास बघता येणार आहे. पृथ्वीवरुन दिसणाऱ्या सूर्याच्या तुलनेत बुधाच्या कोनाचा आकार अतिशय लहान असल्यामुळे तो ठिबक्यासारखा दिसेल.

टेलिस्कोप, दुर्बिण अथवा ग्रहण बघण्याचा चश्मा किंवा गॉगल यांच्या मदतीने तुम्हाला बुध ग्रहाचा हा प्रवास तुम्हाला बघता येईल. तसेच भारताव्यतिरिक्त आशियाच्या बहुतांश भागांमध्ये हा बुध प्रवास दिसणार आहे. युरोप, आफ्रिका, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आर्टिक, उत्तर अटलांटिक तसेच पेसिफिकच्या बहुतांश भागातही तो दिसणार आहे. यानंतर भारतात बुध ग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये १६ वर्षाच्या कालखंडानंतर म्हणजेच २०३२ साली येणार आहे.

Leave a Comment