निस्सानची किक्स रिओ ऑलिंपिकची पार्टनर

kicks
जपानी कारमेकर कंपनी निस्सानने त्यांची एसयूव्ही किक्स क्रॉसओव्हरला रिओ ऑलिंपिक २०१६ गेम्ससाठीची अधिकृत आटोमोबिल पार्टनर म्हणून पेश केले असून ३ मे पासून सरू झालेल्या ऑलिंपिक ज्योत प्रवासात ही एसयूव्ही ज्योतीसोबत राहणार आहे. हा प्रवास ५ ऑगस्ट रोजी ब्राझीलमधील ऑलिंपिक स्टेडियमवर संपेल व त्याच दिवशी ऑलिंपिक्स गेम्स सुरू होतील.

निस्सानने लॅटिन अमेरिकेसाठीचे अध्यक्ष जोसेफ लुईज किक्सचे अनावरण करताना म्हणाले, गेल्या पाच वर्षात लॅटिन अमेरिकेत क्रॉसओव्हर एसयूव्हीच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे. ही वाढ २०० पटीने आहे. आमच्या किक्स एसयूव्हीसाठी ब्राझीलच्या बाजारात मोठ्या संधी आहेत. सध्या ब्राझील मंदीच्या फेजमधून जात असला तरी लवकरच ही मंदी दूर होईल असे संकेत मिळत आहेत. ऑटोमोबिल जगात ब्राझील हा जगातला ५ नंबरचा देश आहे. आम्ही या बाजारात आमचा हिस्सा वाढविण्यासाठी व आमचे स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहोत.

निस्सानच्या किक्सचे सध्या मेक्सिकोतील प्रकल्पातच उत्पादन केले जाणार आहे मात्र लवकरच ती ब्राझीलच्या प्रकल्पात तयार केली जाईल असेही समजते.

Leave a Comment