ट्विटरवर मित्रांना शोधणे झाले आणखी सोपे

twitter
मुंबई – मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर मित्रांना शोधणे आता आणखी सोपे होणार आहे. ट्विटरने आपल्या अॅपवर ‘कनेक्ट’ नावाचे एक टॅब जोडले आहे. हे यूझरची माहिती आणि एक्टिव्हिटीनुसार त्यांना अशा प्रोफाईलबाबतीत सल्ला देणार ज्यांना ते फॉलो करू शकतात.

या टॅबचे वैशिष्टय म्हणजे याच्या द्वारे ट्विटर आपल्या फोनमधील अॅड्रेसबुकला देखील सिंक करू शकते. त्यामुळे आपल्या फोनबुकमधील कोणी व्यक्ती जर ट्विटरशी जोडला गेला तर त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळेल.

याबाबत माहिती देताना ट्विटरचे प्रोडक्ट मॅनेजर रिकार्डो कास्त्रो यांनी सांगितले कि, याच्या मदतीने आप ट्विटरशी जोडल्या जाणाऱ्या आपल्या नव्या मित्राचे स्वागत देखील करू शकता. हे टॅब आयओएस आणि अँड्रोईड या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टमवाल्या स्मार्टफोनसाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

Leave a Comment