चामड्याच्या हँडबॅग्ज, मोबाईल बॅग्ज व अन्य वस्तू बनविणार्या शिन्टुंग टिअँडी या चिनी कंपनीविरोधात ट्रेडमार्कच्या नावाचा वापर केल्याचा अॅपलचा दावा बिजिंग म्युनिसिपल हाय पिपल्स कोर्टाने फेटाळून लावल्याने अॅपलला ही लढाई हरण्याची पाळी आली आहे. शिन्टुंग टिअँडी त्याच्या चामड्याच्या उत्पादनावर वापरत असलेला आयफोन हा लोगो ट्रेडमार्क म्हणून वापरत आहे मात्र हा लोगो वापराची सुरवात होण्यापूर्वीच चीनमध्ये आयफोन हा नावाजलेला ब्रँड होता हे अॅपल न्यायालयासमोर सिद्ध करू शकले नाही.
ट्रेडमार्कसंदर्भातल्या दाव्यात अॅपलची हार
मिळालेल्या माहितीनुसार शिन्टुंग कंपनीने २०१० पासून त्यांच्या हँडबॅग्ज, मोबाईल फोन कव्हर व अ्रन्य चामड्याच्या वस्तूंवर आयफोन ट्रेडमार्कसह विक्रीची सुरवात केली आहे. अॅपलने त्यांच्या इलेक्ट्राॅनिक सामानासाठी आयफोन ट्रेडमार्क नोंदणीची बोली २००२ मध्येच लावली होती मात्र प्रत्यक्षात त्यांना त्याची परवानगी २०१३ साली मिळाली. चीनमध्ये २००९ पासून आयफोनची विक्री सुरू झाली होती. अॅपल हा दावा हरल्याने त्यांच्या आयफोन विक्रीत घट झाली असून अॅपलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण अॅपलच्या उत्पादनांसाठी चीन हा त्यांचा दुसरा मोठा बाजार आहे.