जूनपासून पुन्हा सुरु होणार मिंत्रा.कॉम

myntra
मुंबई – केवळ वर्षभर मोबाईल अॅपच्या माध्यमातून व्यवसाय करणारी फॅशन ई-रिटेलर मिंत्रा एक जूनपासून आपली वेबसाईट सुरु करणार आहे. मिंत्रा वेबसाइटचे डेस्कटॉप आणि मोबाइल व्हर्जन एकाचवेळी सुरु केले जाणार आहे.

दरम्यान मागील वर्षी २०१५ मध्ये मिंत्रा.कॉम वेबसाइटला बंद करण्यात आले होते आणि त्याचसोबत त्याएवजी फक्त मोबाईल अॅपच्या माध्यमातूनच व्यवसाय करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान मिंत्रा फ्लिपकार्टची बिजनेस व्हेंचर आहे. मागील वर्षी मिंत्राने आपली वेबसाईट ८५ टक्के खरेदी मोबाईलच्या माध्यमातून होत असल्याचे सांगत बंद केली होती. फ्लिपकार्ट-मिंत्राच्या महिला ग्राहकांच्या मिळणाऱ्या फीडबॅकमुळे वेबसाइटला पुन्हा सुरु करण्यात येत आहे.

Leave a Comment