लेईकोचा मेड इन इंडिया व मेड फॉर इंडिया स्मार्टफोन

leeco-1s
चीनी कंपनी लेईकोने मुंबईत मंगळवारी सुपरटेनमेंट सर्व्हिसेस सह नवीन एलई वन एस स्मार्टफोनचे नवीन व्हेरिएंट लाँच केले असून हा फोन मेड इन इंडिया आणि मेड फॉर इंडिया असल्याचा दावा केला आहे. या फोनसोबत लेईकोची मेंबरशीप एक वर्षासाठी मोफत दिली जाणार आहे. हा फोन १० भारतीय भाषा सपोर्ट करू शकतो.

या स्मार्टफोनसाठी साडेपाच इंचाचा फुल एचडी इन सेल डिस्प्ले दिला गेला आहे. अँड्राईड ५.० वर आधारित कंपनीच्या स्वतःच्या युजर इंटरफेसवर (ईयूआय)वर तो रन होतो. त्याला ३ जीबी रॅम, ३२ जीबीची इंटरनल मेमरी दिली गेली आहे. रियर कॅमेरा १३ एमपीचा व एलईडी फ्लॅशसह आहे तर फ्रंट कॅमेरा ५ एमपीचा आहे. मिरर फिनिश फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे तसेच सुपरचार्ज फिचरही दिले गेले आहे. म्हणजे ५ मिनिटांच्या चार्जिंगवर तो ३ तासांचा टॉकटाईम देतो. हा फोर जी फोन असून वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, यूएसबी टाईप सी पोर्ट अशी अन्य ऑप्शन्स आहेत. तो मायक्रो व नॅनो सिमसह आहे. येत्या १२ मे रोजी फ्लिपकार्टवर तो फ्लॅशसेलमध्ये ९९९९ रूपयांत मिळू शकेल अन्यथा त्याची किंमत १०८९६ रूपये आहे.

Leave a Comment