महिलांनो सुंदर दिसण्यासाठी हेही करून पहा

makeup
सुंदर दिसण्याची ओढ कुणाला नसते? महिला वर्गात ती जास्त असते असा सार्वत्रिक समज आहे. त्यासाठी सौंदर्यप्रसाधने, सौंदर्योपचारांचा वापर केला जातोच पण कांही खास वेगळा लूक हवा असेल तर युवतीनी कांही हटके जरूर ट्राय करावे. कधीतरी आपल्या नेहमीच्या मेकअप मधील हा बदल खूपच हीट ठरतो तर कधी फसतोही. पण ट्राय करायला काय हरकत आहे? त्यासाठी कांही खास टीप्स येथे देत आहोत.

१)केस कलर- पांढरे केस डोकावू लागले की महिला वर्गाची चिंता अधिक वाढते. आजकाल तर तरूणपणातच केस पांढरे होत चाललेत. यामुळे कलर डाय करणे हे सर्रास केले जाते. मात्र त्यात केसांच्या जवळचा कलर अधिक वापरला जातो. एकादेवेळी सोनेरी किंवा लालसर केस कलर अवश्य वापरून पहा. एकदम हटके लूक मिळेल. समजा कलर शोभत नाही असे वाटले तर तो काढून टाकता येतो. मात्र एकदा असे कलर ट्राय तर करा! हटके लूक मिळाला असेल तर सेल्फी काढायला विसरू नका

२)वॅक्सिंग- वॅक्सिंगमुळे अंगावरच्या नको असलेल्या केसांपासून सुटकारा मिळतोच पण टॅन झालेली त्वचा मूळ रंगावर येण्यासही मदत मिळत असते. त्यामुळे वॅक्सिंग हा प्रकार वेदनादायी असला तरी तो वेळेवर करण्याचा कंटाळा मात्र करू नका. सौंदर्यासाठी थोड्याश्या वेदना सहन करायला हरकत नसावी. हो ना!

३)रेड लिपस्टीक- लिपस्टीक हा आजकाल रोजच्या मेकअपचा भाग झाला आहे. ओठ आकर्षक दिसण्यासाठी व प्रदूषणापासून ओठांचे रक्षण करण्यासाठी लिपस्टीक हवी. मात्र ती ठळक दिसू नये अशा प्रकारेच वापरली जाते. कधीतरी पार्टीत, विशेष मिटींगला खास रेड लिपस्टीकचा वापर करून पहा. ती वापरणे इतके सोपे नाही कारण हा रंग वापरायचे धाडस मुली दाखवत नाहीत. कांही जणींना ती शोभणार नाही पण निदान ती ट्राय केल्यामुळे तुमचा आत्मविश्वास नककीच वाढलेला दिसून येईल.

makeup2
४)खास परफ्यूम निवडा- रोजच्या मेकअपमध्ये परफ्यूमचा वापर हाही रूळलेला प्रकार आहे. परफ्यूमचे अनेक प्रकार आज उपलब्ध आहेत. मात्र आपल्या व्यक्तीमत्त्वाला शोभेल असा परफ्यूम आपणच शोधायला हवा. वेगळ्या सुंगधाचा हा परफ्यूम तुमची ओळख बनला पाहिजे. म्हणजे हा सुवास येताच मित्रमैत्रिणी, परिचितांना तुमचीच आठवण आली पाहिजे.

५)हे डेरिंग करा- आपला रोजचा लूक बदलण्यासाठी कांही वेगळे बदल जरूर करून पहा. कदाचित अशा स्वतःच्या लूकची कल्पनाही तुम्ही कधी करणार नाही. पण तरीही ते जरूर करून पहा. म्हणजे कधीतरी केस बारीक कापा, काळ्या रंगाचे नेलपेंट वापरा, डोळ्यांना सुखवतील असे ड्रेस परिधान करा व स्वतःतच झालेल्या बदलाची मजा लुटा. विशेषतः पार्टी, ऑफिस मिटींग, डेटला जाताना ते ट्राय करायला हरकत नाही.

६)मेकअपची सर्व माहिती असू द्या- दरवेळी ब्यूटी पार्लरमध्ये जाणे शक्य होते असे नाही. कांही वेळा महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी अचानक जावे लागते व ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसतो. अशावेळी न गोंधळता स्वतःच तयार व्हायला शिका. अगदी केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत स्वतःच नटा. एकादी वेगळी हेअरस्टाईल जी तुम्हाला शोभून दिसते तिचा पत्ता अशा अवचित नटण्यातून लागू शकतो. स्वतःच तयार होण्याचा दुसर्‍यांवर कसा प्रभाव पडतो हे एकदा जरूर पहायला हवे. हा एकप्रकारचा तुमचा स्वतःचा शोध ठरू शकतो.

७)मेकअप विना रहा- सौंदर्य टीपमधील हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मेकअपमुळे सौंदर्य खुलते व व्यक्तीमत्त्व आकर्षक बनते हा समज तितकासा खरा नाही. सुट्टींच्या दिवशी व फारसे महत्त्वाचे कार्यक्रम नसतील तर एखादा दिवस विना मेकअप रहा. खात्री बाळगा की तेव्हा तुम्ही सर्वात सुंदर दिसता. कारण शेवटी विना मेकअप तुम्ही जशा आहात, तशाच दिसता ना. आहे तसेच दिसण्याचा आनंद वेगळाच असतो याची अनुभूती घ्या.

Leave a Comment