बँकांचे ६६ हजार कोटी रुपये कर्जबुडव्यांनी थकविले

jayant-sinha
नवी दिल्ली – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ६६,१९० कोटी रुपये देशातील मोठय़ा कर्जबुडव्यांकडे अडकले आहेत. स्टेट बॅक ऑफ इंडियाचे (एसबीआय) सर्वात जास्त कर्जबुडवे आहेत. एसबीआयचे ११,७०० कोटी रुपये कर्जबुडव्यांनी थकविले आहेत. तर एसबीआयच्या सहकारी बँकांना कर्जबुडव्यांनी १८,७०० कोटी रुपयांचा चुना लावला आहे. अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी ही माहिती दिली आहे. मात्र आतापर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांच्या अंतर्गत कर्जबुडव्यांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. ही आकडेवारी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची आहे.

३१ डिसेंबर २०१५ पर्यंत १६६९ कर्जबुडव्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यांच्यावर बँकांचे २८,२०० कोटी रुपयांचे कर्ज होते. काही लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर काही बँकांनी नियमानुसार कर्जबुडव्यांवर कारवाई सुरू केली आहे. मागील ३१ मार्च २०१५ पर्यंत देशभरात सरकारी बँकांच्या ७,०३५ कर्जबुडव्यांकडे ५९,००० कोटी रुपये अडकले आहेत. ते आता वाढ होत ६६,१९० कोटी रुपये झाले आहेत.

Leave a Comment