दुबईत अधिक पावसासाठी बनतोय कृत्रिम पर्वत

dubai
अनेक सुंदर वास्तूरचना, जगातील सर्वात उंच इमारत, जगातील सर्वात मोठे कृत्रिम बेट अशी अनेक आश्चर्य आणि रेकॉर्डस नोंदविणार्‍या दुबईत पावसाचे प्रमाण वाढविण्यासाठी कृत्रिम पर्वत बनविण्याचे काम सुरू झाले आहे. या प्रकल्पासाठी २३० अब्ज डॉलर्सचा खर्च अपेक्षित आहे व या प्रकल्पाच्या संशोधनासाठी ४० हजार डॉलर्सची फी दिली गेली आहे. अर्थात पर्यटकांना ही त्यांच्या प्रेक्षणीय स्थळात हा पर्वत पाहता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेतील नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक रिसर्च संस्थेकडे हे कंत्राट दिले गेले आहे. संस्थेचे प्रमुख रोएलोफ ब्रुनिटजेस या संदर्भात म्हणाले की सुमारे १.२ मैल उंचीचा पर्वत बनविण्यात येणार असून त्यामुळे हवेपासून पावसाचे ढग निर्माण करण्यास मदत होणार आहे. हा पर्वत कोणत्या जागी उभारायचा याचा शोध घेतला जात आहे. पहिल्या फेजचे काम या उन्हाळ्यात सुरू केले गेले आहे. सध्या दुबईत कृत्रिम पावसाचे प्रयोग केले जात आहेत.

Leave a Comment