स्वस्त झाला ‘कूलपॅड नोट ३’

coolpad
मुंबई : आपल्या ‘कूलपॅड नोट ३’ या स्मार्टफोनच्या किंमतीत कूलपॅड या चीनमधील प्रसिद्ध कंपनीने कपात केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने हा स्मार्टफोन ८ हजार ९९९ रुपयांना लॉन्च केला होता आणि आता या स्मार्टफोनमध्ये ५०० रुपयांची कपात केली आहे. आता या स्मार्टफोनची नवी किंमत ८ हजार ४९९ रुपये असेल. स्मार्टफोन अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

५ इंच डिस्प्ले असलेल्या फोनचे रिझॉल्युशन ७२०×१२८० पिक्सेल एवढे आहे. याचा प्रोसेसर ६४ बिट ऑक्टॉकोर मीडियाटेकचा असून यात ३ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटरनल मेमरी (६४ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा) देण्यात आली आहे. याचा रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा ५ मेगापिक्सेलचा आहे. यात फिंगरप्रिंट सेन्सर, ३६० डिग्री रोटेशनची सुविधा देखील देण्यात आली आहे.

Leave a Comment