सौर ऊर्जेचा प्रसार करण्यासाठी सौर विमानाद्वारे जगभ्रमंती

solar
अ‍ॅरिझोना : अ‍ॅरीझोना प्रांतात नुकतेच जगाच्या सफरीवर निघालेले एक विमान मुक्कामी आलेले आहे. मात्र हे विमान केवळ सौर ऊर्जेवर चालणारे असून सौर ऊर्जेवर चालणारे विमान जगाच्या सफरीसाठी जाण्याचा हा आजवरचा पहिलाच प्रयत्न आहे.

जगावेगळ्या सफरी करण्याचे वेड तसे अनेकांना अस्ते, या सफरीतील थरार, प्रवासादरम्यानचे थ्रिल अनुभवण्यासाठीच जगभरातील धाडसी लोक अशा अचाट गोष्टी करत असतात. असेच धाडस हे सौर विमान घेऊन निघालेल्या दोन वैमानिकांनी केले असून सोमवारी मध्यरात्री अ‍ॅरीझोना प्रांताच्या फोइनिक्स गावात उतरले आहे.अ‍ॅन्ड्रे बॉश्र्बर्ग आणि ब-ट्रॅन्ड पिकार्ड हे या विमानाचे धाडसी वैमानिक आहेत.त्यांनी आपल्या जागतिक हवाई सफरीची सुरुवात सोमवारी पहाटे कॅलिफोर्नियापासून केली आहे.सोलार इम्पल्स टू असे या सौर विमानाचे नाव असून ते स्वित्झर्लॅडमध्ये विकसित करण्यात आलेले आहे. इम्पल्सला बोर्इंग ७४७ या शक्तिशाली विमानापेक्षाही जास्ती लांबीचे दोन पंख असून त्यात १७ हजारहून अधिक सोलर सेल्स आहेत. जे सौर ऊर्जा साठवून घेत असतात. या सफरीसाठी आम्ही मागच्या वर्षापासून सराव आणि मानसिक तयारी करत असून मागच्या आठवड्यात हवाई ते सिलिकॉन व्हॅली अशी सफर पूर्ण केलेली आहे.हा प्रवास बहुतांशी दिवसाच करावा लागतो. साठवलेली सौरऊर्जा रात्री प्रवासासाठी वापरता येते, मात्र लँड करण्यासाठी योग्य ठिकाण सापडण्याची शक्यता नसल्यामुळे रात्रीचा धोका पत्करता येत नाही,अशी माहिती बॉश्र्बर्गने दिली. मर्यादित नैसर्गिक संपदेचा विचार करता सौर ऊर्जा या स्त्रोताची माहिती लोकांना व्हावी त्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा या हेतूने आम्ही हे धाडस करत आहोत असे त्याचा साथीदार पिकार्ड याने नमूद केले.या सफरीसाठी सुमारे १०० मिलियन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित आहे.अटलांटिक समुद्री सिमा ओलांडण्यापूर्वी आम्ही अमेरिकेत आणखी दोन मुक्काम करणार आहोत.त्यानंतर आम्ही युरोपमध्ये जाणार असल्याचेही त्याने सांगितले.

Leave a Comment