सेल्फीप्रेमींसाठी आता फ्लेक्सिबल कॅमेरा

selfi
लॉस वेगास : सेल्फीच्या काठीला आता तुम्हाला बाय-बाय करावा लागणार आहे. कारण तुमच्या भेटीला फ्लेक्सिबल कॅमेरा येत आहे. त्यामुळे सेल्फी स्टिकची क्रेझ संपणार असेच दिसत आहे. लहान मुले असो किंवा मोठी माणस असो, सर्वांनाच सेल्फीच वेड लागलेले असते. अनेकांच्या हातात सेल्फी स्टिक दिसत आहे. पण तुमच्यासाठी लवकरच फ्लेक्सिबल कॅमेरा भेटीला येत आहे. हा कॅमेरा घड्याळ्याप्रमाणे हातावर बांधायचा आहे आणि हातावर बांधलेला असतानाच आपल्याला फोटो देखील काढता येतो. अमेरिकेतील लास वेगास येथील ‘कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक शो’ नुकताच पार पडला. यावेळी हे गॅझेट सादर करण्यात आला.

Leave a Comment