सुनीता विल्यम्ससह चौघांना नव्या अवकाशयानाच्या संचलनाचे प्रशिक्षण

sunita-williams
वॉशिंग्टन : बोर्इंग कंपनीच्या सीएसटी १०० स्टारलायनर या अवकाशयानाच्या मदतीने सुनीता विल्यम्ससह चार अवकाशवीरांना द नॅशनल एरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे ‘नासा’ ही अमेरिकी अवकाश संशोधन संस्था आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात पाठवणार आहे. गेल्या पाच वर्षांतील ‘नासा’ ची ही पहिलीच समानव अवकाश मोहीम असणार आहे. कारण स्पेसशटल अवकाशयाने याआधीच बंद करण्यात आल्याने रशियाच्या मदतीने अवकाशवीर अंतराळ स्थानकात जात होते. आता सीएसटी १०० स्टारलायनरच्या मदतीने अवकाशात जाण्यासाठी संगणकीय सादृश्यीकरण चाचण्या घेतल्या जात असून त्यात अवकाश प्रवास प्रशिक्षकांपेक्षाही चांगली तयारी करून घेतली जाते व काही अवघड प्रसंग आल्यास काय करता येईल याचे प्रशिक्षण दिले जाते, असे सुनीता विल्यम्स हिने म्हटले आहे. सॉफ्टवेअर बदलून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो व नंतर तेच सॉफ्टवेअर मोठ्या सादृश्यीकरण यंत्रात लावले जाऊ शकते.

Leave a Comment