नवी दिल्ली – संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने मागील आठवडय़ात रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची उपकंपनी असलेल्या रिलायन्स डिफेन्सला देण्यात आले आहेत. सध्या एकूण पंचवीस परवाने रिलायन्सकडे असल्यामुळे या क्षेत्रातील सर्वाधिक परवाने असणाऱया कंपन्यांमध्ये आता रिलायन्सचा समावेश झाला आहे.
संरक्षण क्षेत्रातील पंधरा नवे परवाने रिलायन्स डिफेन्सला
रिलायन्स डिफेन्सला नवे परवाने अवजड शस्त्रास्त्रे, सशस्त्र वाहने, दारूगोळा, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली, यूव्ही आणि डायरेक्टेड ऊर्जा शस्त्रास्त्र प्रणालीसारख्या उच्च तंत्रज्ञानांनी सज्ज असलेल्या उपकरणांचे उत्पादन घेण्यासाठी देण्यात आले आहेत. यापूर्वी रिलायन्स डिफेन्सकडे १० परवाने होते. १० परवाने जमिनी प्रणालीसाठी, ३ परवाने नौदालाशी संबंधित आणि २ परवाने अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी देण्यात आले आहेत.