फेसबुकच्या चुका शोधणाऱ्या चिमुकल्याला बक्षीस!

facebook
न्यूयॉर्क- फेसबुकने एका दहा वर्षांच्या चिमुकल्याला सोशल नेटवर्किंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फेसबुकवरील चुका शोधल्यामुळे त्याला १० हजार डॉलरचे बक्षीस दिले आहे.

फेसबुकने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इन्स्टाग्रामवर फेसबुकवरील छायाचित्र शेअर करताना अडथळा निर्माण होत होता. या चिमुकल्याने याबाबतची माहिती ई-मेलच्या माध्यमातून फेसबुकच्या लक्षात आणून दिली होती. आता हा अडथळा फेसबुकने दूर केला आहे. याबद्दल चिमुकल्याला १० हजार डॉलरचे बक्षीस देण्यात आले आहे. चिमुकल्याला भविष्यात सुरक्षिततेबाबत संशोधन करण्याचे स्वप्न आहे. तंत्रज्ञान युगात हे काम खूप महत्त्वाचे आहे. त्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल. दरम्यान, फेसबुककडून बक्षीस मिळालेली रक्कमेमधून मोटारसायकल, फुटबॉल व दोन भावांसाठी कॉम्प्युटर खरेदी केले आहेत.

Leave a Comment