कर्जफेडीची रोकड दाखवाल तेव्हा खरे- अरूंधती रॉय

arundhti
स्टेट बँकेच्या प्रमुख अरूंधती रॉय यांनी कर्जफेडीचे नुसते प्रस्ताव व जर तरची भाषा मला समजत नाही तर कर्जफेडीसाठी आवश्यक रोकड दाखवा असे स्पष्टपणे सांगितले आहे. विजय माल्यांनी बँकेची देणी फेडण्याची इच्छा व्यक्त करून व तसा प्रस्ताव देऊनही बँकांनी त्यांचे प्रस्ताव फेटाळल्या संदर्भातील प्रश्नांना एका मुलाखतीत त्या उत्तर देत होत्या. फ्रँकफर्ट येथे झालेल्या एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या वार्षिक परिषदेसाठी त्या आल्या होत्या तेव्हा त्यांनी माल्या यांच्या कर्जासंबंधी प्रश्न विचारले गेले होते.

अरूंधती रॉय म्हणाल्या, माल्या यांच्या कडून आलेल्या प्रस्तावांचे आम्ही परिक्षण करत आहोत. माल्या यांनी त्याचा प्रस्ताव बँकांनी ठोकरल्याचे सांगितले आहे पण मुळात प्रश्न आहे तो हा की ज्यांच्या संपत्तीची माहिती वारंवार विचारणा करूनही आम्हाला दिली गेली नाही त्याच्या कर्जफेडीच्या प्रस्तावावर आम्ही विश्वास ठेवायचा कसा हा. माल्या यांच्या संपत्तीची माहिती मिळविण्यासाठी आम्हाला सुप्रीम कोर्टाची मदत घ्यावी लागली.ज्याच्या संपत्तीची माहिती नाही त्याची कर्जफेड क्षमता कशी जोखता येणार? त्यामुळे मला जर तर ची भाषा नको तर कर्जफेडीसाठी आवश्यक रोकड कुठे आहे हे दाखविले गेले पाहिजे. ही माहिती मिळाली की आम्ही वन टाईम सेटलमेंटबाबत नक्कीच विचार करू शकतो असेही त्या म्हणाल्या.

Leave a Comment