कँसर असूनही ६६व्या वर्षात करतात बॉडी बिल्डिंग

robert
लुईसव्हिले, अमेरिका – आजवर बॉडीबिल्डिंगला फक्त तरुणांचा क्रीडा प्रकार म्हणून गणले जात होते, पण अमेरिकेतील ६६ वर्षांचे आजोबा रॉबर्ट डर्बिन यांनी या क्रीडा प्रकारात तरुणांना आवाहन देत आहेत. पण यात हैराण करणारी गोष्ट म्हणजे रॉबर्ट डर्बिन हे कँसर असूनही हे सर्व करत आहेत.

याबाबत रॉबर्ट सांगतात कि, एके दिवशी मी जिममध्ये दोन तास व्यायाम केल्यानंतर घरी जात होतो, तेव्हा एका तरुणाने एका हाताने पुश-अप करण्याचे आव्हान दिले. मी १० पुश-अप मारले, पण तो तरुण फक्त चारच पुश-अप मारू शकला. रॉबर्ट आपल्या अनुशासन आणि अधिक वयाच्या व्यतिरिक्त बॉडीबिल्डिंगसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात बघितले जातात आणि स्थानिक लोक त्यांना ‘रॉक हार्ड पापा’ नावाने हक मारतात. इंस्टाग्रामवर त्यांचे १२ हजार पेक्षा जास्त फॉलोअर आहेत.

Leave a Comment