शास्त्रज्ञांनी लावला तीन नव्या ग्रहांचा शोध

planet
पॅरिस : शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या वातावरणाशी साधर्म्य असलेल्या तीन ग्रहांचा शोध लावला आहे. हे संशोधन ‘नेचर’ या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे. पृथ्वीपासून हे ग्रह ४० प्रकाशवर्ष दूर आहेत.

हे ग्रह अत्यंत थंड असलेल्या बटू ताऱ्याभोवती परिभ्रमण करत आहेत. या ग्रहांचा आकार आणि तापमान काही प्रमाणात पृथ्वी तसेच शुक्रासारखेच असावं, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावल्यामुळे या तिन्ही ग्रहांवर जीवसृष्टी असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

बेल्जियमचे खगोलभौतिक शास्त्रज्ञ मायकल गिलन आणि त्यांच्या टीमने हा ग्रहांचा शोध लावला आहे. आपल्या सौरमालेबाहेर जीवसृष्टी असू शकते आणि याचे रासायनिक पुरावे शोधण्याची ही पहिलीच संधी आहे, असे मायकल गिलन म्हणाले. नव्याने सापडलेल्या या तिन्ही ग्रहांचा आकार पृथ्वीएवढंच असू शकते. तसेच वातावरणही सारखे असावे, या शोधामुळे जीवसृष्टीबाबत सुरु असलेल्या प्रयत्नांना गती मिळण्याचा अंदाज आहे.

Leave a Comment