५ मे ला भारतात लाँच होणार होंडा BR-V

honda-br-v
मुंबई – दिल्लीतील ऑटो एक्स्पो २०१६ मध्ये होंडा BR-V या गाडीला शोकेस करण्यात आले होते. आता भारतात ५ मे रोजी या कॉम्पेक्ट एसयुवीला लाँच करण्यात येणार आहे.

कंपनीने होंडा BR-V या गाडीची बुकिंग देखील सुरू केली आहे. या गाडीला बुक करण्यासाठी ग्राहकांना २१ हजार रूपये जमा करावे लागणार आहे. होंडा BR-Vची किंमत ८ लाखापासून सुरू होऊन ती १२ लाखापर्यंत आहे. या कारची टक्कर रेनॉ डस्टर, निसान टेरानो, महिन्द्रा स्कॉर्पियो, टाटा सफारी आणि ह्यूंदै क्रेटा सोबत होणार आहे.

होंडा BR-V ला ब्रियो आणि अमेजप्रमाणेच मोबिलियोच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. मात्र एक्सटीरियर आणि इंटिरियरच्या तुलनेत ही कार वेगळी आहे. होंडा BR-V ही होंडा सिटीप्रमाणेच पेट्रोल आणि डिझेल इंजिनवर आहे. पेट्रोल वर्जनमध्ये १.५ लीटरचे आय विकेट इंजिन आणि जिझेल वेरियंटमध्ये १.५ लीटरचे आय डिटेक इंजिन उपलब्ध आहे. या गाडीचे कॉम्पेक्ट एसयूवीचे रियर प्रोफाईल देखील उत्तम आहे. ओवरऑल लुक्ससाठी ही गाडी उत्तम आहे.

गाडीचे डॅशबोर्ड स्टाईलिश करण्यासाठी एसी वेंटसच्या चारही बाजूला अॅल्युमिनियम फिनिशवाली पट्टी आणि सेंटर कंसोलवर ग्लॉसी ब्लँक फिनिश देण्यात आली आहे. गाडीमध्ये कॉम्पॅक्ट एसयूवीमध्ये एबीएस, ईबीडी, ड्यूल फ्रंट एअरबॅग, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोल्स, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल आणि प्रोजेक्टर हँडलँप्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Leave a Comment