१६ हजार कोटीचा ‘आयपीओ’ आणणार ‘व्होडाफोन’

vodafone
नवी दिल्ली – भारतात सर्वात मोठा ‘आयपीओ’ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणण्याच्या तयारीत मोबाईल सेवा प्रदान करणारी कंपनी ‘व्होडाफोन’ आहे. ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच’, ‘कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग’ आणि ‘यूबीएस’ यांना जागतिक स्तरावरील समन्वयक म्हणून व्होडाफोनने नेमले. ‘व्होडाफोन’ या आयपीओच्या माध्यमातून १६ हजार ५०० कोटी रुपये कमविणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘व्होडाफोन’ पुढील वर्षी आयपीओ दाखल करेल.

वर्ष २०१० मध्ये आलेल्या कोल इंडिया कंपनीच्या आयपीओनंतर देशात सर्वात मोठा आयपीओ ‘व्होडाफोन’चा असेल. कोल इंडियाने आयपीओच्या माध्यमातून १५,१९९ कोटी रुपये कमविले होते. आता व्होडाफोन १६,५०० कोटी रुपये कमविण्याच्या तयारीत आहे.

ब्रिटीश दूरसंचार कंपनी व्होडाफोन पीएलसीने आपली भारतातील शाखा व्होडाफोन इंडियाला शेअरबाजारात लिस्ट करण्यासाठी ‘बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच’, ‘कोटक इन्व्हेस्टमेंट बँकिंग’ आणि ‘यूबीएस’ यांना संयुक्त मदतीने आयपीओ योजना पुढे सुरू ठेवण्याची जबाबदारी दिली आहे. तसेच आयसीआयसीआय सिक्युरिटी, एचएसबीसी आणि डॉइश्चे बँक यांनाही यामध्ये प्रतिनिधीत्व दिले आहे.

Leave a Comment