सौदीत बनले पहिले वुमन बिझिनेस पार्क

wipro
भारताच्या आय टी क्षेत्रातील अग्रणी विप्रो आणि सौदी अराम्को व प्रिन्सेस नूरा विद्यापीठ यांनी संयुक्त सहकार्यातून रियाध येथे उभारलेल्या पहिल्या वुमन बिझिनेस आणि टेक्नॉलॉजी पार्कचा शुभारंभ करण्यात आला आहे. २०२५ सालापर्यंत या पार्कमध्ये २१ हजार महिलांसाठी नोकर्‍या व प्रशिक्षणाची व्यवस्था केली जाणार आहे. प्रिन्सेस नूरा विद्यापीठ व विप्रो अरेबिया यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबविला आहे.

वास्तविक २०१३ मध्ये टीसीएसने रियाध मध्ये पहिले महिलांसाठीचे बिझिनेस प्रोसेस सर्व्हिस सेंटर सुरू केले आहे. व तेथे सध्या १ हजार महिला नोकरी करत आहेत.त्यातील ८५ टक्के महिला सौदीतील आहेत. विप्रो वुमन पार्क मध्ये महिलांना नोकर्‍यांबरोबर प्रशिक्षणही दिले जाणार आहे. सौदीत सध्या ६० टक्के महिला पदवीधर आहेत मात्र त्यातील १५ टक्कयांपेक्षाही कमी महिला नोकरी करतात. विप्रोचे प्रमुख अजीम प्रेमजी म्हणाले, व्यवसायात महिलांचा सहभाग आणि हिस्सेदारी वाढविणे हा या पार्कमागचा मुख्य हेतू आहे.

Leave a Comment