शाओमीचे खास मुलांसाठी एमआय बनी स्मार्टवॉच

watch
शाओमीने खास मुलांसाठी पहिले वहिले स्मार्टवॉच एमआय बनी नावाने लाँच केले आहे. हे वॉच जसे मुलांसाठी उपयुक्त आहे तसेच ते पालकांसाठीही मदतगार ठरणार आहे. सध्या ते चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे व त्याची किंमत आहे २९९ युआन म्हणजे ३ हजार रूपये. या वॉचमुळे पालक आपल्या मुलांना अधिक सुरक्षितता देऊ शकतील असा कंपनीचा दावा आहे.

या वॉचमध्ये जीपीएस कनेक्टीव्हीटी, ग्लोनास, वायफाय सुविधा आहेत व ते व्हॉईस कॉलला सपोर्ट करते. या वॉचला सिमकार्डही आहे. यात कुटुंबातील सहा सदस्याचे नंबर स्टोअर करता येतात व त्या नंबरबरोबर मोफत संवाद साधता येतो. मूल जवळपास नसले तरी कुटुंबिय अॅपच्या मदतीने त्याच्याशी संवाद साधू शकतात. तसेच यात एकच टॅपने कुटुंबातील सदस्यांबरोबर मुलांना कॉल करणे व कॉल घेणे शक्य होते. मुलांची झोप कशी झाली हेही हे वॉच मॉनिटर करते. विशेष म्हणजे शाळेचा रस्ता, घराचा आसपासचा परिसर असा एरिया पालक यात मार्क करू शकतात. त्यामुळे मार्क केलेल्या मार्गापेक्षा अन्यत्र कुठे मुले जात असतील तर तशी सूचना पालकांना येते शिवाय मुलाचे लोकेशनही कळू शकते.

या वॉचला एसओएस प्रमाणे पॅनिक साठी बटण दिले गेले आहे शिवाय अपरिचित नंबर्सवरून येणारे कॉल ते आपआपच रिजेक्ट करते. तीन महिन्यांपर्यंत रोजच्या अॅक्टीव्हीटी रेकॉर्ड करण्याची त्याची क्षमता आहे. या घड्याळाला एलईडी डॉट मेट्रीक्स डिस्प्ले, कॉर्निंग लिक्विड सिलीकॉन स्ट्रॅप दिला गेला आहे. अँड्राईड ४.२ व त्यावरच्या डिव्हायसेसवर ते काम करते. निळा आणि गुलाबी अशा दोन रंगात ते उपलब्ध आहे.

Leave a Comment