भारतात लॉन्च झाली टोयोटाची नवी इनोव्हा क्रिस्टा

toyota
मुंबई: नवीन इनोव्हा या गाडीचे अपडेट व्हर्जन भारतीय बाजारात टोयोटा या कार कंपनीने लॉन्च केले आहे. ही कार नुकतीच मुंबईत लॉन्च करण्यात आली असून या कारची मुंबईतील किंमत १३.८ लाख रूपयांपासून सुरू होते. टोयोटाने या कारचे ६ व्हेरिएंट्स लॉन्च केले आहेत.

ग्राहकांकडून टोयोटाच्या याआधीच्या सर्वच कार्सना चांगला प्रतिसाद मिळाला. आता या कंपनीने अधिक आरामदायक आणि आलिशान कार आणल्या आहेत. या कार्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत. इनोव्हा क्रिस्टामध्ये २.४ लिटर आणि २.८ लिटर डिझल इंजिन आहे. यात स्टॅन्डर्ड ५ स्पीड मॅन्युअल आहे आणि टॉप एंड २.८ लिटरच्या इंजिनसोबत ६ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स असा पर्यायही देण्यात आला आहे.

या कारच्या फ्रंट शार्प बॉडी लाईंस, नवीन हेलिपॅड क्लस्टर आणि नवीन २ स्लेट क्रोम ग्रिल देण्यात आली आहे. नव्या इनोव्हा क्रिस्टा जुन्या इनोव्हाच्या तुलनेत लांब आणि रूंद आहे. इंटेरिअरमध्ये कॅबिनमध्ये वुड फिनीश डिझाईन, ७ इंचचा नेव्हिगेशन असलेला ट्चस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टीम, लेदर अपोहस्ट्री, फिल्डेबल सीट बॅक टेबल, ८ वे पॉवर एडजस्ट सीट सुविधा देण्यात आली आहे. सोबतच ही कार सेकेंड रो मध्ये सिल्वर डॅशचा वापर करण्यात आला आहे. त्यासोबतच या कारमध्ये २० बॉटल होल्डर देण्यात आले आहे. थर्ड रोमध्ये बसणा-या लोकांसाठी एक वेगळा एसी वेंटही देण्यात आला आहे.

Leave a Comment