ब्राझीलमध्ये व्हॉट्सअॅपवर बंदी

whatsapp
ब्रासिलिया – ब्राझीलमध्ये न्यायाधीश मार्सेल मोंताल्वो यांनी व्हॉटसअॅप ७२ तासांची बंदी घालण्यात आली आहे. एका गुन्हेगारी प्रकरणाशी संबंधित माहिती व्हॉटसअॅपची मालकी असलेल्या फेसबुकने न्यायालयाला दिली नव्हती. त्यामुळे न्यायाधीशांनी थेट व्हॉटसअॅपवर बंदी घातली आहे.

२०१४मध्ये व्हॉट्सअॅप फेसबुकने विकत घेतले आहे. दोन व्यक्तींच्या दरम्यान झालेली संवाद-संदेशाची देवाण घेवाण सर्वस्वी गुप्त ठेवण्याच्या फेसबुकच्या पॉलिसीमुळे गुंता निर्माण होत आहे. कारण जेव्हा देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न येतो तेव्हाही आम्हाला व्हॉट्सअॅपचे संदेश उघड करता येणार नाहीत, अशी फेसबुकची भुमिका आहे. याने व्यक्तिगत स्वातंत्र्याचा मोठा विस्तार झाला पण सार्वजनिक किंवा राष्ट्रीय हिताचा संकोच झाला आहे. याच भुमिकेतून न्यायालयाने बंदीचा आदेश दिला आहे.

दरम्यान ७२ तासांसाठी ब्लॉक करण्याच्या निर्णयामुळे निराशा झाली. आम्ही न्यायालयाला पूर्णत: सहकार्य केले होते, असा दावा व्हॉटसअॅपने केला आहे. हा निर्णय म्हणजे ब्राझीलच्या दहा कोटींपेक्षा जास्त लोकांना शिक्षा केल्यासारखे आहे, जे आमच्या सेवेवर विश्वास ठेवतात, असेही व्हॉटसअॅपने म्हटले आहे. यापूर्वी आदेश न मानणाऱ्या एका फेसबुक एक्झिक्युटिव्हला अटक करण्याचा आदेश न्यायाधीश मार्सेल मोंताल्वो यांनी यंदाच्या मार्च महिन्यात दिला होता.

Leave a Comment