जागतिक विक्रम; एकाच दादल्याच्या तेरा बायका एकाचवेळी गरोदर

pregnant
लंडन: तुम्ही आजवर अनेक माध्यमातून विचित्र घटना ऎकल्या असतील, बघितल्या असतील. पण अशी घटना बहुदा तुम्ही कधीही ऎकली नसेल. एका व्यक्तीच्या तेरा बायका एकाचवेळी गर्भवती आहेत असे जर आम्ही तुम्हाला सांगितले तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या फोटोत दिसणा-या माणसाने तेरा लग्न केली असून, त्याच्या सर्व बायका एकाचवेळी त्याच्यापासून गर्भवती राहिल्या आहेत.

या दादल्याने केलेली ही करामत जागतिक विक्रम ठरला आहे. एकाचवेळी १३ बायका गर्भवती असण्याची ही पहिलीच घटना आहे. जनरली एका व्यक्तीला दोन बायका असल्या की, त्यांच्यात भांडणे, तंटे हे होताना बघायला मिळते. नव-याची पळता भूई होते. पण या व्यक्तीने कमालच केली आहे. पण येथे या माणसाच्या सर्व बायका प्रेमाने परस्परांशी जुळवून घेत आहेत. त्यांना आपल्या नव-याबद्दल अभिमान आहे. यातील एक बाई दुसरीबद्दल बोलताना भरभरुन बोलते.

ज्या देशातील ही व्यक्ती आहे तिथे तेरा विवाह कायदेशीर आहेत. यावर कोणतेही बंधन नाही. हा जगातील पहिलाच माणूस असावा ज्याच्या सर्व बायका एकाचवेळी गर्भवती आहेत. या तेरा बायकांच्या प्रेगनन्सीमध्ये तीन ते पाच आठवडयांचे अंतर आहे.

Leave a Comment