एसबीआयने व्याजदर घटवले

sbi
मुंबई : कर्जदारांसाठी देशातील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल करणाऱ्या व सर्वात मोठी असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) एक खूशखबर दिली आहे. आपल्या ‘एमसीएलआर’च्या (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग) दरात पाच अंशांनी एसबीआयने कपात केली असून, त्याचा परिणाम म्हणून कर्जांवरील व्याजदरात कपात झाली आहे.

गृहकर्ज, वाहन, शैक्षणिक आणि वैयक्तिक कर्ज घेतलेल्या कर्जदारांना एसबीआयच्या या निर्णयामुळे फायदा मिळणार आहे. नव्या आर्थिक वर्षात २ एप्रिल रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेने मांडलेल्या पतधोरणानंतर स्टेट बँकेने सलग दुसऱ्या महिन्यात दुसऱ्यांदा दरकपात केली आहे. कर्जाच्या विविध प्रकारांनुसार नवे दर लागू होणार आहेत. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने व्याजदारात कपात केल्यानंतर एसबीआयचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्याजदरात ०.२५ बेसिस पॉइंटची कपात जाहीर केली होती. एसबीआयने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग (एमसीएलआर) रेटमध्ये ०.५ टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे हा दर (एमसीएलआर) ९.२० टक्क्यांवरुन ९.२५ टक्क्यांवर गेला आहे.

Leave a Comment