आंबा आणि टरबूजाच्या मदतीने मिळवा ग्लोईंग स्कीन

chehara
उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेकडे लक्ष देणे आवश्यक असते कारण तीव्र सूर्यकिरणांमुळे त्वचा रापते व निस्तेज दिसू लागते. स्पा मध्ये जाऊन ब्यूटी ट्रीटमेंट घेणे हा त्यावरचा हमखास उपाय असला तरी दररोज पार्लरमध्ये जाणे वेळखाऊ आणि पैसे खाऊही आहे. मात्र उन्हाळ्यात हमखास घराघरात असणारी आंबा आणि कलिंगड ही फळे या कामी तुम्हाला उपयोगी पडू शकतात. घरच्याघरी, फावल्या वेळात आणि खर्च न करताही तुम्ही तुमच्या स्कीनचा गेलेला ग्लो परत मिळवू शकता आणि उन्हाळ्यातही तजेलदार त्वचा राखू शकता.

टरबूज किवा कलिंगड खाण्यामुळे उन्हयाळात जितके फायदे मिळतात तसेच फायदे त्वचेसाठीही मिळू शकतात. टरबूज त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तसेच ते चेहर्‍याचा कोरडेपणाही दूर करते. कलिंगड खाल्याने शरीरातील पाण्याची पातळी चांगली राहते व त्यामुळेही त्वचा आपोआपच फ्रेश दिसते. १ वाटी कलिंगडाच्या रसात दोन चमचे कणकेचा कोंडा व १ चमचा मिल्क पावडर घालून केलेला पॅक चेहरा, मान, गळा व हातापायावर लावता येतो. १० मिनिटांनंतर हा पॅक चोळून चोळून काढला व स्वच्छ धुतले की त्वचेवरचा राप कमी झालेला दिसेल. हाताशी वेळ कमी असेल तर १ चमचा कलिंगड रसात १ चमचा दही घालून तो पॅक चेहर्यािला लावा व १५ मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा, त्वचेवर ताजेपणा आलेला जाणवेल.

आंबाही त्वचा रक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दोन चमचे आंबा रसात थोडी साखर घालून चेहरा व हातपायावर चोळून लावा. नंतर हलक्या हाताने चोळून धुवून टाका. आठवड्यातून एक वेळा हा उपाय केला तरी मृत त्वचा निघून जाते आणि चेहरा चमकतो. आंब्याची कोय उकडून आतील गर कुसकरा. त्यात दोन चमचे मुल्तानी माती घालून हे मिश्रण चेहरा, हातापायांवर लावा. हा पॅक दाट असतो व त्यामुळे ३० मिनिटे वाळण्यासाठी ठेवा. पाण्याने धुतल्यानंतर त्वचा अतिशय कोमल झालेली दिसेल.

त्याचबरोबर १ छोटा आंब्याचा रस, १ चमचा अक्रोड पावडर,२ चमचे ओटमील व ३ चमचे मुल्तानी माती मिक्सरमध्ये फिरवून चेहरा व हातापायांवर लावा. स्क्रब करून गार पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्वचेला आलेला ग्लो तुमचा मूड एकदम मस्त करेल याची खात्री बाळगा.

Leave a Comment