ही आहे जगातील सर्वात खतरनाक तरुणी

danger
वॉशिंग्टन : जगातील सर्वात खतरनाक महिला म्हणून अमेरिकेची एरिन कैफी असल्याचे बोलले जाते. कारण तिने वयाच्या १६ व्या वर्षी तिच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी ती ८ वर्षापासून तुरुंगात आहे.

एका न्यायाधीशाने या महिलेची काही दिवसांपूर्वीच मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर तिला क्रुर म्हटले होते. एका शोसाठी त्यांनी या महिलेची मुलाखत घेतली होती पण त्यावेळेस ते अतिशय घाबरलेल्या स्थितीत होते.

न्यायाधीशांनी म्हटले की, आतापर्यंत मी अनेक लोकांना भेटलो पण याआधी ऐवढी भीती कधीच वाटली नव्हती. मला विश्वासच नाही बसत की ही २४ वर्षाची ऐवढी सुंदर मुलगी स्वत:च्या कुटुंबीयांची हत्या कशी करु शकते आणि याबाबत तिला काहीच वाटत नाही. एरिनने आई आणि ३ भावांची हत्या केली होती. वयाच्या ५९ व्या वर्षी ती तुरुंगातून बाहेर येणार आहे. तिचे पिता मात्र आजही तिला भेटण्यासाठी तुरुंगात जातात.

Leave a Comment