मुंबईहून न्यूयॉर्कला जाण्यासाठी मोजा २५ लाख रुपये

etihad-airways1
मुंबई – एतिहाद एअरवेजने १ मेपासून अबु धाबी ते मुंबई दरम्यान आपली पहिली एअरबस ए३८० विमानसेवा सुरु केळी तेव्हाच ही विमानसेवा सगळ्यात महागडी विमानसेवा देणाऱ्याच्या यादीत सामील झाली आहे. या विमान सेवेसाठी एकावेळेस ३.३१ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.

४९६ प्रवासी क्षमता असलेल्या या विमानात रेसीडेंस, दोन लोकांसाठी एक लक्झरी सूईट, शॉवर रूम, डबल बेडचा बेडरूम आणि लिव्हिंग रूमचा समावेश आहे.
etihad-airways
आज गल्फ कॅरियरने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार या सर्व सुविधांसाठी न्यूयॉर्क-मुंबई मार्गाच्या एकावेळेच्या तिकिटासाठी ३८ हजार डॉलर (२५.२२ लाख रुपये) मोजावे लागतील. त्याचबरोबर अबुधाबी-मुंबई मार्गाच्या एकावेळेच्या तिकिटासाठी ५ हजार डॉलर (३.३१ लाख रुपये) आणि लंडन-मुंबई मार्गाच्या एकावेळेच्या तिकिटासाठी २६ हजार डॉलर (१७.२५ लाख रुपये) मोजावे लागणार आहेत.

एतिहादच्या भारतातील उपाध्‍यक्ष नीरजा भाटिया यांनी याबाबत माहिती देताना व्यस्त मार्गांवर पडलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही विमानसेवा भारत दाखल केली गेली आहे. मुंबईत ही विमानसेवा दाखल करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे भाटिया यांनी म्हटले आहे. ए ३८० मुंबई विमानात कंपनीचे पहिले अपार्टमेंट्स आणि बिजनेस स्‍टूडिओ देखील आहे.

Leave a Comment