बनावट वस्तूंच्या उत्पादनात भारत पाचव्या स्थानी

fake
नवी दिल्ली – भारत बनावट वस्तूंच्या उत्पादनामध्ये जगात पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. यामध्ये चीन पहिल्या स्थानी आहे. जगात या वस्तूंच्या होणा-या उत्पादनामध्ये चीनची ६३ टक्के हिस्सेदारी असून भारत केवळ १.२ टक्क्यांवर आहे. हा व्यापार अनुमानित रुपात जवळपास ५० हजार कोटी डॉलर्सचा आहे. बनावट वस्तूंच्या उत्पादनात अमेरिकेचा प्रभावित होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

चीननंतर अव्वल ५ देशांमध्ये तुर्कस्थान, सिंगापूर, थायलँड आणि भारताचा क्रमांक लागतो. हे सर्व देश नकली वस्तूंचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन करतात. याबाबतची माहिती ओईसीडी (ऑर्गनायझेशन इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट) आणि युरोपियन महासंघाच्या ‘प्रॉपर्टी ऑफिस’च्या अभ्यासात प्रसिद्ध झाली. जगभरात नकली वस्तूंचा जेवढा व्यापार होतो, त्यामध्ये चीनची हिस्सेदारी ३६.२ टक्के, दुस-या स्थानी असणारे तुर्की ३.३ टक्के आहे. तर सिंगापूर, थायलंड आणि भारताची हिस्सेदारी क्रमश: १.९ टक्के, १.६ टक्के आणि १.२ टक्के आहे.

Leave a Comment