‘फ्युचर रिटेल’ ‘एमडी’पदाचा बियाणींनी दिला राजीनामा

kishore
मुंबई – ‘फ्युचर रिटेल‘च्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा (एमडी) उद्योजक किशोर बियाणी यांनी राजीनामा दिला आहे. बियाणींच्या फ्युचर समुहाच्या रिटेल व इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाची पुनर्रचना केली जात असल्यामुळे हा राजीनामा त्यांनी दिला आहे. सोबतच, कंपनीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राकेश बियाणी यांनीदेखील कंपनीतील पदाचा राजीनामा दिला आहे.

बियाणींच्या फ्युचर समुहाची पुनर्रचना करण्याची घोषणा वर्षभरापुर्वी केली होती. त्यानुसार, ‘फ्युचर रिटेल‘ कंपनीच्या रिटेल व्यवसायाचे भारती समुहाच्या ‘भारती रिटेल‘मध्ये विलीनीकरण केले जाणार आहे व त्यानंतर भारती रिटेलच्या इन्फ्रास्ट्रक्चर व्यवसायाचे फ्युचर समुहाच्या व्यवसायासोबत विलीनीकरण केले जाणार आहे. भारती रिटेलने फ्युचर ग्रुपचा रिटेल व्यवसाय ७५० कोटी रुपयांना खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. फ्युचर रिटेलच्या व्यवसायाची उलाढाल १५,००० कोटी रुपये आहे.

Leave a Comment