तब्बल १२ लाख रुपये एका शून्यासाठी मोजले

mukesh-ambani
मुंबई : शून्याला किंमत नसते असे म्हटले जाते. मात्र एका शून्यासाठी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना चक्क १२ लाख रुपये मोजावे लागले आहेत.

अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी साडेचार कोटी रुपयांची रोल्स रॉईस ही गाडी घेतली. या गाडीसाठी त्यांनी ००१ असा नंबर मिळवला होता. त्यासाठी त्यांनी १२ लाख रुपये भरले होते. मात्र हा नंबर अशुभ असल्याचे त्यांच्या ज्योतिषांनी सांगितल्यानंतर त्यांनी ०००१ हा नवा नंबर मिळवला. मात्र या एका शून्यासाठी त्यांना पुन्हा एकदा तब्बल १२ लाख रुपये खर्च केले. गाड्यांवर आपल्या आवडीचा नंबर हवा असल्यास त्यासाठी वेगेळे पैसे मोजावे लागतात. मात्र केवळ एक शून्य वाढवण्यासाठी अंबांनी यांनी लाखो रुपये खर्च केले.

Leave a Comment