डेजर्ट गोल्ड रंगात उपलब्ध झाली एवेंजर क्रुझ २२०

avenger
नवी दिल्ली – बजाज ऑटोने एवेंजर क्रुझ २२०ला एका ऑप्शन रंगात लॉन्च केले आहे. याच्या डेजर्ट गोल्ड रंगातील मॉडेलची किंमत (एक्स-शोरूम, दिल्ली) ८५,४९७ रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.

बजाज एवेंजर क्रुझ २२०च्या नव्या कलर ऑप्शनमध्ये ब्राउन सीट लावण्यात आली असून गाडीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान डेजर्ट गोल्ड हा रंग केवळ क्रुझ २२०मध्येच उपलब्ध आहे. बाईक विक्रेत्यांच्या अनुसार ही बाईक आगामी काही दिवसातच विक्रीसाठी उपलब्ध होइल. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये कंपनीने बजाज एवेंजरची नवी सीरीज लॉन्च केली होती.

Leave a Comment