गिनीज बुकमध्ये नाशिकमधील गोल्डमॅनच्या शर्टची नोंद

pankaj-parakh
नाशिक : गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवल्याच्या पंकज पारख यांचा सोन्याचा शर्ट नोंदला गेला आहे. गिनीज बुकने या शर्टची नोंद जगातला सर्वात महागडा शर्ट म्हणून घेतली आहे.

लहानपणापासून सोन्याच्या दागिन्यांची हौस असलेल्या पंकज यांनी नाशिकच्या बाफणा ज्वेलर्सकडून हा शर्ट बनवून घेतला होता. दुबईच्या एका सोनाराचे हे डिझाईन असून तो घडवण्यासाठी १९ कारागिरांनी मेहनत घेतली होती. २०१४ रोजी आपल्या ४५व्या वाढदिवसानिमित्त ४ किलो सोन्याचा हा शर्ट त्यांनी सर्वप्रथम घातला. गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यामुळे आपल्याला अत्यंत आनंद झाल्याची प्रतिक्रिया पारख यांनी दिली आहे.

Leave a Comment