नवी दिल्ली : इराणसोबतचे हायड्रोकार्बन क्षेत्रातील सहकार्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने भारताने तेल आयातीची शिल्लक देयक रक्कम ६.५ अब्ज डॉलर्स देण्यास तयार असल्याचे कळविले आहे. ही रक्कम देयक पद्धतीतील स्पष्टतेनंतर लवकरात लवकर दिली जाणार असल्याचे भारताने स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी चालू महिन्यात इराणच्या दौ-यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर थकबाकी अदा करण्याचा संदेश इराणला कळविण्यात आला आहे. हा मुद्दा निकालात काढण्यासाठी तेहरान आणि नवी दिल्लीदरम्यान विविध स्तरांवर गंभीर चर्चा झाल्याचे सरकारच्या सूत्राकडून सांगण्यात आले. ऐतिहासिक अणू करारानंतर इराणवरील निर्बंध उठविण्यात आले होते.
इराणला थकबाकी देणार भारत
यानंतर इराणने ३ वर्षे जुनी भारताबरोबरची व्यवस्था संपुष्टात आणली होती. यानुसार भारत निम्मे तेल देयक रुपयात देत असे तसेच इराणने भारतीय तेलशुद्धीकरण कंपन्यांना दिली जाणारी मोफत डिलिव्हरीची सुविधादेखील रद्द केली आहे. इराण आता तेलआयातीचे बिल युरोमध्ये देण्याचा आग्रह करीत आहे. पाश्चिमात्य देशांकडून निर्बंध उठविण्यात आल्यानंर बँकिंग प्रणालीच्या वापराबाबत अडचणी समोर आल्या आहेत कारण अजून नियमित बँकिंग व्यवहार शक्य झालेले नाहीत. एस्सार ऑईल आणि मंगलोर रिफायनरी अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची इराणकडे जवळपास ६.५ अब्ज डॉलर्सची थकबाकी आहे.
फेब्रुवारी २०१३ पासून भारतीय रिफायनर्स एस्सार ऑईल अणि एमआरपीएलने आयात बिलाचा ४५ टक्के हिस्सा इराणी तेल कंपनीच्या युको बँकेतील खात्यात भारतीय रुपयात जमा केला आहे. देयक यंत्रणेला अंतिम रूप देण्यात आल्यानंतर उर्वरित रक्कम अदा करण्यात येईल, असे समजते. पेटड्ढोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान आणि विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी मागील महिन्यात इराणला भेट दिली होती. या वेळी या दोघांनी इराणला तेल आणि वायू क्षेत्रात भारताची इराणसोबत भागीदारी वाढविण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले होते. थकबाकीचा मुद्दा इराणकडून त्यांच्यासमोर उपस्थित करण्यात आला होता.
इराणसोबत हायड्रोकार्बन क्षेत्रातील व्यवहार वाढविण्याच्या उद्देशाने भारताने हा पुढाकार घेतल्याचे मानले जात आहे. तेलसाठ्याने समृद्ध असलेल्या इराणला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात भेट देण्याची शक्यता असल्यामुळे हा संदेश देण्यात आला आहे. तेहरान व दिल्लीत या मुद्यांवर चर्चेच्या अनेक फे-या झाल्या असून हा मुद्दा लवकरच निकाली निघेल असा दोन्ही बाजूंना विश्वास असल्याचे सरकारमधील सूत्रांनी सांगितले. या पूर्वी गेली ३ वर्षे इराणमधून घेतलेल्या तेलासाठ्याची निम्मी रक्कम भारत रुपयांमध्ये देत होता. मात्र गेल्या जानेवारीत एका ऐतिहासिक अण्वस्त्र कराराद्वारे इराणवरील निर्बंध उठविण्यात आल्यानंतर भारतीय कंपन्यांना विकल्या जाणा-या तेलाची रक्कम युरोमध्ये दिली जावी.