विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ

lpg
नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ केल्यानंतर आणखी एक झटका सर्वसामान्यांना दिला आहे. १८ रुपयांनी विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या दरामध्ये वाढ करण्यात आली. जागतिक बाजारात किमती वाढल्याने ही दरवाढ करावी लागल्याचे सरकारने म्हटले आहे. सध्या ग्राहकांना वर्षाला १२ सिलेंडरवर अनुदान मिळते. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये ८२.५० रुपयांनी, मार्चमध्ये ६१.५० रुपयांनी तर एप्रिलमध्ये ४ रुपयांनी विनाअनुदानित सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या.

Leave a Comment