ईस्टर – रहस्यमय मूर्तींचे द्विप

murti
चिली देशांतील ईस्टर नावाचे द्विप रहस्यमय मूर्ती असलेले बेट म्हणून जगप्रसिद्ध आहे. या मूर्ती एक दोन नाहीत तर त्यांची संख्या आहे ६००. महाकाल शिळांपासून बनविलेल्या या मूर्ती इतक्या मजबूत आहेत की अगदी हातोड्यांनी त्यावर घाव घातले तरी बारीकसे एकदोन टवके उडण्यापलिकडे त्यांचे फारसे नुकसान होत नाही. सुमारे १०० टनी वजनाच्या या मूर्ती ३० ते ४० फूट उंचीच्या आहेत. त्यांना माआई या नावाने ओळखले जाते.

या मूर्ती दिसायलाही जवळजवळ एकसारख्याच आहेत. जणू एकाच साच्यातून त्या बनविल्या गेल्या असाव्यात. मात्र या द्विपावर कुणीच राहात असल्याचे पुरावे नाहीत त्यामुळे या मूर्ती कुणी बनविल्या किंवा समजा त्या बाहेरून येथे आणल्या गेल्या असल्या तरी इतक्या जड आणि इतक्या संख्येने असलेल्या या मूर्ती येथे आणल्या तरी कशा हे प्रश्न उरतातच. त्यामुळेच त्यांना रहस्यमय मूर्ती म्हटले जाते. या मूर्ती कुणी बनविल्या याचे सोपे उत्तर स्थानिकांकडे आहे. त्यांच्या मते या मूर्ती एलियन्स किंवा परग्रहवासियांनी बनविल्या आहेत. कांही शतकांपूर्वी या मूर्ती बनविल्या गेल्या मात्र अर्ध्यातच टाकून हे परग्रहवासी निघून गेले असाही समज आहे.

मात्र पुरातत्त्व संशोधकांच्या मते या बेटावर फार प्राचीन काळी रापा नुई नावाची जमात रहात होती.त्यांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आणि त्यांना सन्मान म्हणून या मूर्ती बनविल्या असाव्यात. मात्र कांही काळानंतर अशी मूर्ती बनविणे हे प्रतिष्ठेचे लक्षण बनले असावे आणि त्यामुळे या बेटावर इतक्या प्रचंड वृक्षतोड झाली असावी की त्यामुळे इथे राहणे व जगणे अडचणीचे बनले असावे. परिणामी मूर्तींचे काम अर्धवट सोडून या लोकांना हे बेट सोडावे लागले असावे.

Leave a Comment