हॉनरचा नवीन ५ सी स्मार्टफोन लाँच

huwaei
नवी दिल्ली : आपल्या हॉनर या ब्रँडनेमखाली चिनी मोबाईल फोन उत्पादक कंपनी हुवेईने नवीन स्मार्टफोन हॉनर ५ सी लाँच केला आहे. ५ सी स्मार्टफोनच्या ३ जी फोनची किंमत ९ हजार २०० रूपये, तर ४ जी फोनची किंमत १० हजार २०० रूपये आहे.

या फोनमध्ये ५.२ इंचाची एचडी स्क्रीन देण्यात आली असून प्रोसेसर ऑक्टाकोअर ६५० आणि २ जीबी रॅम देण्यात आले आहेत. यात १६ जीबी इंटर्नल मेमरी देण्यात आली आहे, जी १२८ जीबी पर्यंत वाढवता येते. याचा बॅक कॅमेरा १३ मेगापिक्सलचा LED फ्लॅशसह आणि फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. याचे ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉईड ६.० मार्शमेलो आधारित आहे. यात ब्ल्यूटूथ V४.१, वायफाय, जीपीएस, ग्लोनास यासारख्या कनेक्टीव्हीटी देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment