शास्त्रज्ञांनी लावला बिगरशेपटीच्या ‘मॅन्क्स’ धूमकेतुचा शोध

comets
जालंधर : आपल्या गटातील पहिलाच बिगर शेपटीचा धूमकेतु शोधण्यात खगोलशास्त्रज्ञांनी यश मिळवले आहे. या नव्या धूमकेतुमुळे सूर्यमालेची निर्मिती आणि तिच्या विकासाचे रहस्य उलगडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही माहिती सायन्स ऍडव्हान्सिस या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली आहे.

या धूमकेतुचे नाव ‘मॅन्क्स’ असे बिगरशेपटीच्या मांजरांच्या प्रजातीवरून ठेवण्यात आले आहे. बहुतेक धूमकेतु हे बर्फ आणि इतर पदार्थांपासून बनलेले तसेच सूर्यमालेपासून दूरच्या अंतरावर असतात. मात्र, हा धूमकेतु पृथ्वीजवळ आढळणाऱया खडकाळ पदार्थांपासून बनलेला आहे. ‘मॅन्क्स’च्या शोधानंतर संशोधकांनी म्हटले आहे, की हा धूमकेतु पृथ्वीप्रमाणे याच भागात बनला असेल. परंतु गुरूत्वाकर्षणामुळे जसे ताऱयांना मागे लोटले जाते तसेच या धूमकेतुलाही सूर्यमालेच्या सर्वात मागच्या भागात लोटले गेले असेल. संशोधक आता अशाच प्रकारचे आणखी काही धूमकेतु आहेत का, त्याचा शोध घेत आहेत. या माध्यमातून आपली सूर्यमाला कशाप्रकारे आणि केव्हा तयार झाली याची माहिती मिळवण्याचा संशोधकांचा प्रयत्न आहे.

Leave a Comment