नवी दिल्ली – सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने बीटा संस्करणाचे खूप महिने परीक्षण केल्यानंतर विंडोज १०साठी नवीन फेसबुक आणि मॅसेंजर अॅप लाँच केले आहे. फेसबुकने विंडोज १० मोबाईलसाठी फोटो शेअरिग अॅप इंस्टाग्रामला देखील अपडेट केले आहे. याबाबतची माहिती कंपनीचे डेव्हिड फील्ड्स यांनी दिली आहे.
विंडोज १०साठी नवे फेसबुक आणि मॅसेंजर अॅप
डेस्कटॉप फेसबुक : कंपनीचा दावा आहे कि फेसबुकचे नवीन डेस्कटॉप अॅप अधिक स्पीडने न्यूजफीड लोड करते. नवीन अॅपवर डेस्कटॉप नोटिफिकेशनसोबतच यूजर नवीन फेसबुक लाईव्ह टाइलदेखील पिन करू शकतात. यूजर कोणत्याही अॅप किंवा फाइल फोल्डरमधून फेसबुकवर फोटो टाकू शकतात. या अॅपमध्ये रिअॅक्शन, स्टिकर आणि उजव्याबाजूच्या कॉलममध्ये वाढदिवस, इव्हेंट रिमाइंडर, ट्रेंडिंग टॉपिक्ससारखे फिचर्सचा समावेश आहे.
फेसबुक मॅसेंजर : यामध्ये स्टिकर, ग्रुप कनव्हर्सेशन आणि जीआईएफसारख्या फिचर्सचा समावेश आहे. याच्या व्यतिरिक्त डेस्कटॉप नोटिफिकेशनद्वारा पहिल्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे चॅटिंगची मजा घेतली जाऊ शकते.
इंस्टाग्राम अॅप : यामध्ये इंस्टाग्राम डायरेक्ट, एक्सप्लोरर आणि व्हिडीओसारखे फिचर्सचा समावेश आहे. हे अॅप यह लाईव्ह टाइलला देखील सपोर्ट करते.