रजिस्ट्रेशनविना शाओमी Mi 5 चा ओपन सेल

xaiomi
मुंबई : ४ मे रोजी शाओमीचा फ्लॅगशीप स्मार्टफोन Mi 5 भारतात उपलब्ध होणार असून हा फोन कोणत्याही रजिस्ट्रेशन शिवाय ओपन सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. Mi 5 सोबतच २० हजार mAh पॉवर बँकही Mi.com वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे.

भारतात गेल्या आठवड्यात रेड मी नोट ३ सोबतही Mi 5 ओपन सेलमध्ये लाँच करण्यात आला होता. चीनमध्ये स्टँडर्ड एडिशन असलेले व्हेरिअंट भारतात उपलब्ध होत आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोरेज असलेल्या फोनची किंमत २४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. सध्या Mi.com वरच फोनची विक्री होत असली तरी लवकरच इ-कॉमर्स पार्टनरसोबत टायअपचा कंपनीचा विचार आहे.

Leave a Comment