या शाळेत शिकताहेत २८ जुळी

twins
आंध्राच्या चिन्नूर येथील कॅम्पर्ड इंग्लीश मिडीयम ही शाळा अनोख्या कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या शाळेतील १०५० विद्यार्थ्यांपैकी ५६ विद्यार्थी वेगळे आहेत म्हणजे ही मुले जुळी आहेत. त्यात चार वर्षांच्या विद्यार्थ्यांपासून ते १६ वर्षाच्या जुळ्याचा समावेश आहे. अर्थात या शाळेने जुळ्या मुलांसाठी कांही खास प्रवेश योजना कधीच आखली नव्हती मात्र अवचितपणे ते घडत गेले असे शाळेचे प्रमुख सी. महेश सांगतात. या शाळेत मोठ्या संख्येने जुळी आहेत अशी बातमी पसरत गेल्यानंतर जुळे झाले की केवळ चित्तूरमधलेच नाही तर आसपासच्या गावातले लोकही शाळा प्रवेशासाठी येथे येतात असेही महेश सांगतात.

juli
या २८ जुळ्यामधले १० जुळ्या मुली, १२ जुळे मुलगे व ६ जुळे बहिण भाऊ आहेत. कांही आयडेंटिकल ट्विन्स आहेत. म्हणजे ती दिसायला अगदी एकसारखी आहेत. परिणामी शिक्षकांना त्यांना ओळखण्यात अडचणी येतात. मात्र त्याचा त्रास न करून घेता शिक्षक या अडचणींतून कांही ना कांही मार्ग काढतात. या मुलांसाठी शाळेने एक खास दिवस साजरा करण्याची प्रथाही ठेवली आहे. त्या दिवशी सर्व जुळी मुले, मुली एकसारखे पोशाख घालून शाळेत येतात. त्याला अपवाद जुळ्या बहीण भावांचा असतो. ही मुले मात्र वेगळे कपडे घालू शकतात.

Leave a Comment